देशभरात प्रसिद्ध असलेल्या तळवलकर व्यायामशाळेचे मधुकर तळवलकर यांचा ८७वा वाढदिवस नुकताच झाला. त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे. व्यायामाच्या अत्यंत काटेकोर सवयीमुळे त्यांनी ही आरोग्यसंपन्नता साध्य केली आहे. त्यांचा याबद्दलचा प्रेरणादायी व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ येथे देत आहोत.
मधुकर तळवलकर म्हणतात...
आज मी ८७ वर्षांचा आहे. माझं आरोग्य अत्यंत उत्तम आहे. माझं शरीर कधीही, कशाचीही तक्रार करत नाही. माझे गुडघे कधीही मला अडचणीत आणत नाहीत, माझी पाठ-कंबर दुखत नाही आणि माझं हृदयही ठणठणीत आहे. हे सगळं कशामुळे साध्य झालं, तर आरोग्य चांगलं राखण्यासाठी मी घेतलेले कष्ट, शिस्त, आई-वडिलांचं मार्गदर्शन, सात्त्विक पौष्टिक आहार आणि कुटुंबीयांचा पाठिंबा ही त्याची कारणं सांगता येतील.
तुम्ही तरुण आहात, मग सुदैवी आहात, आजच व्यायामाला सुरुवात करा! तुम्ही प्रौढ आहात, तरीही सुदैवी आहात. आजच व्यायामाला सुरुवात करा! आणि तुम्ही वृद्ध असलात, तर तुम्ही ज्ञानसंपन्न आहात. तुम्ही सुदैवी आहात. आजच व्यायामाला सुरुवात करा. शरीराच्या प्रत्येक भागाची काळजी घ्या... तुम्ही नक्कीच समृद्ध व्हाल.